दड्डी (वार्ताहर) : सलामवाडी ता. हुक्केरी येथे मा. नवजीवन युवक संघ सलामवाडी यांच्या सौजन्याने भव्य बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शर्यतीत कर्नाटक, महाराष्ट्र भागातील 50 बैल जोडी मालकांनी भाग घेतला होता. एक मिनिट गाडी पळविण्याच्या शर्यतीत सिद्धेश्वर प्रसन्न (कुदनुर) यांच्या जोडीने 1890.4 इतके अंतर ओढून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अंजनेय प्रसन्न (अलारवाड) यांच्या जोडीने 1872.0 अंतर ओढून व तृतीय क्रमांक कलमेश्वर प्रसन्न (अनगोळ-सांगाव) 1870.5 इतका अंतर ओढून व चौथा क्रमांक मिल्का ग्रुप (आजरा अमरोली) यांनी 1852.08 इतका अंतर ओढून मिळवला. पाचवा क्रमांक बेनकाई देवी (बेटगेरी) यांच्या जोडीने 1847.4 इतके अंतर ओढून मिळवला. यांना अनुक्रमे रु 25001, 21001, 18001, 15001, 12001 अशी 15 बक्षीस देण्यात आली व दोन लकी नंबर देण्यात आले. लकी नंबर 13 वा. नागनाथ प्रसन्न (बेकीनकेरी सुळगा) व 18 वा लकी नंबर श्री शिवशंभो मित्र मंडळ (तळेवाडी नेसरी) यांना स्टील पाण्याची टाकी, तांब्या व कासारा जोड देण्यात आले.
या शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी दयानंद पाटील स्विस सहाय्यक प्रतीक सावंत (धनश्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स) व माजी सैनिक लक्ष्मण पाटील, एम ए पाटील, तानाजी सुंडकर, उदय पाटील, यल्लाप्पा पाटील, नारायण पाटील, उत्तम सावंत, सुरेश अस्वले, सदाशिव बराटे, विजय पाटील, मनोहर पाटील, चंद्रकांत पाटील, रवींद्र गोंधळी, मारुती पाटील, दयानंद पाटील, आनंद पाटील, देवानंद सुतार, देवानंद होडगे गावातील युवा कार्यकर्ते, मुंबई मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta