दड्डी (वार्ताहर) : सलामवाडी ता. हुक्केरी येथील ओंकार गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या महिलांसाठी बॉल फेकणे, डोक्यावरून फुगे मारणे, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, उखाणे, आरती तयार करणे इत्यादी स्पर्धात्मक खेळ घेण्यात आले.
स्पर्धेत पहिला क्रमांक शुभांगी शिवाजी बुवा, द्वितीय क्रमांक रेखा वसंत सावंत, तृतीय क्रमांक रेणुका शाहू देसाई, चौथा क्रमांक मिलन देवदास सावंत यांनी पटकविला. विजेत्या महिलांना अनुक्रमे प्रथम बक्षीस वितरण पैठणी साडी करण्यात आली. द्वितीय क्रमांकसाठी मिक्सर, देण्यात आले. तृतीय क्रमांकसाठी कुकर देण्यात आले. चौथा क्रमांकासाठी भिंतीवरील घड्याळ अशी बक्षीस देण्यात आली. होम मिनिस्टरचा कार्यक्रम दत्ता पाटील यांनी पंच नियोजन मास्तर काम पहिले. याप्रसंगी प्रवीण पाटील, गजानन पाटील, अंबाजी बराटे, संकेत गोंधळी, सतीश पाटील, नागेश पाटील, साहिल पाटील, दयानंद,पाटील, सुभाष पाटील, सुधाकर देसाई, शाहू देसाई, रेखा बराटे, वैशाली पाटील, माया पाटील, माधुरी पाटील, सुनीता पाटील, अंजना पाटील यांच्यासह ओंकार गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta