
दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा हायस्कूल सलामवाडी शाळेचे मुख्याध्यापक बी व्ही पेडणेकर यांनी 33 वर्ष व क्लार्क अरुण ईरपाणा पाटील हे 31वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या शुभेच्छा समारोप प्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील, पी. पी. बेळगावकर, पी. आर. पाटील व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी ढोल ताशा टाळ्यांच्या तालावर आपल्या लाडक्या मुख्याध्यापक बी. व्ही. पेडणेकर व क्लार्क अरुण ईरपाणा पाटील यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष शिवाजी कळवीकट्टेकर हे होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एन. के. गुरव यांनी केले.
शिक्षण हे व्यक्ती आणि समाज परिवर्तनाची एक प्रभावी साधन आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाने 1 जून 1987 रोजी रोजी घटप्रभा हायस्कूल सलामवाडी शाळेची स्थापना केली तेव्हापासून शिक्षक म्हणून व क्लार्क म्हणून आपण दोघांनी काम केले व नंतर पेडणेकर मुख्याध्यापक झाले व क्लार्क म्हणून अरुण पाटील झाले त्यांना ग्रन्ड मिळाले आज या ठिकाणी अनुदान नसताना देखील संघर्ष जीवन शाळेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. आपण दोघांनी केलेल्या 33 वर्षाच्या काळात 23 वर्ष बिन पगारी शिक्षण सेवा केली. सेवेच्या काळात हजारो गुणवंत विद्यार्थी घडविले त्यांच्याकडून मानाचा मुजरा. हायस्कूल सलामवाडी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बि व्ही पेडणेकर व त्यांच्या पत्नी माया पेडणेकर व क्लार्क अरुण ईरपाणा पाटील व त्यांच्या पत्नी कविता पाटील यांचा दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, आजी-माजी विद्यार्थी संघटना सलामवाडी, गग्रामपंचायततर्फे, भागातील शट्टीहळ्ळी, मरणहोळ, धोंडगट्टे भागातील विद्यार्थी व मान्यवाराच्या हस्ते शाल, भेट वस्तू व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पेडणेकर यांनी 33 वर्षात शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला व पुढील वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला शाळा सुधारणा समिती मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी भागातील पालक वर्ग तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एम हुद्दार यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta