Sunday , December 7 2025
Breaking News

जय भवानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, खवणेवाडी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन..

Spread the love

 

दड्डी : जय भवानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ खवनेवाडी ता – हुक्केरी जि – बेळगांव येथे भव्य 58 किलो वजनी गटात कबड्डी स्पर्धेचे आयोजन खास दीपावली निमित्त शनिवार दि. १८/१०/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ०५ वाजता आयोजित केली आहे. तरी हौशी महाराष्ट्र – कर्नाटक कबड्डी प्रेमींनी याचा लाभ घ्यावा ही विनंती..

या स्पर्धेचे उद्घाटक – मा. श्री. जोतिबा हणमंत पाटील (उद्योजक – साफल्य मेकॅनिकल वर्कस् , मुंबई.)

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे – सौ. गोपाबाई राजू सुतार ( ग्रा. पं. सदस्या) व श्री. कृष्णा विठ्ठल हराडे (उपाध्यक्ष, ग्रा. पं. कोट)

प्रमुख उपस्थिती व नियोजक – सर्व सन्माननीय अध्यक्ष व सदस्य ग्रा. पं. कोट, श्री विठ्ठलाई देवी पाटील ट्रस्ट, श्री चाळोबा ट्रस्ट, श्री ईरदेव ट्रस्ट, श्री सार्व. गणेशोत्सव मंडळ, श्री विठ्ठलाईदेवी दूध संघ, श्री चाळेश्वर कृषी पत्तीन सोसायटी, सरकारी मराठी शाळा, खवनेवाडी. ग्रामविकास मंडळ मुंबई. भिमसेना मंडळ, सर्व महिला मंडळे व सन्माननीय देणगीदार, पंच कमिटी, माजी ग्रा. पं. सदस्य, देवस्थान पंच कमिटी. व समस्त ग्रामस्थ, खवनेवाडी.

*प्रवेश फी : ४०१ /-

पुढील प्रमाणे भव्य बक्षीसे अशी आहेत

प्रथम क्रमांक – ७००१/-
द्वितीय क्रमांक – ५००१/-
तृतीय क्रमांक – ३००१/-
चतुर्थ क्रमांक – १००१/-
अशी बक्षीसे असून उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड साठी आकर्षक चषक व विजयी संघांना देखील आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.

सर्व बक्षिसे – कै. गं. भा. बयाबाई यल्लाप्पा पाटील व कै. हणमंत यल्लाप्पा पाटील यांचे स्मरणार्थ, श्री. जोतिबा हणमंत पाटील (उद्योजक – साफल्य मेकॅनिकल वर्कस् , मुंबई ) यांचेकडून..

स्पर्धेचे ठिकाण – श्री. चाळोबा मंदिराचे भव्य पटांगण, खवनेवाडी,
हत्तरगी (NH4) पासून १० किमी, दड्डी मोदगे २ कि.मी, ➡️खवनेवाडी ⬅️ बटकणंगले, नेसरी, पासून १० कि.मी.

या कार्यक्रमाचे समालोचक – श्री. सागर रू. हराडे व श्री. अर्जुन जा. हराडे यांनी काम पाहणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क –
रोशन पाटील – 8291657534
पांडूरंग देशवळ – 6366058426
वैभव हराडे – 7899646886

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीत रंगला होम मिनिस्टरचा कार्यक्रम…..

Spread the love  दड्डी (वार्ताहर) : सलामवाडी ता. हुक्केरी येथील ओंकार गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *