संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेच्या मासिक सभेत नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी उपनगराध्यक्ष अजित करजगी सभापती सुनिल पर्वतराव आणि सर्व २८ सदस्यांनी पाणीपट्टी वर्षाकाठी दोन हजार रुपये आकारणेचा मांडलेला ठराव मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी धुडकावून लावलेला दिसत आहे. पालिका २४×७ पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली लोकांची लुबाडणूक करीत असल्याचे दिसून येताच सर्व २८ सदस्यांनी अन्यायकारक पाणीपट्टी थांबवावी आणि जानेवारी २०२२ पासून पाणीपट्टी वर्षाकाठी दोन हजार रुपये आकारण्याचा ठराव मांडला आहे. तो मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी धुडकावून लावत मिटर रेडिंगनुसार पाणीपट्टी आकारणेचे कार्य चालविलेले दिसत आहे.यावरुन पालिकेत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सभापती आणि सर्व सदस्यांपेक्षा जगदीश ईटी वरचढ ठरलेले दिसत आहेत. पालिकेतील सर्व २८ सदस्य आता यावर कोणता निर्णय घेतात इकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले दिसत आहे.
मिटर रेडिंगनुसार पाणीपट्टी
प्रभाग क्रमांक ४ मध्ये आयोजित समस्या निवारण सभेत मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी पाणीपट्टी मिटर रेडिंगनुसारच आकारली जाणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.येथे रवि नार्वेकर यांनी पाणीपट्टी विषयी ईटी यांना छेडले असता त्यांनी पाणीपट्टी मिटर रेडिंगनुसारच भरावी लागणार असल्याचे सांगितले आहे.