संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाच्या विकासात श्रीं सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे मोठे योगदान राहिल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. निडसोसी श्रींनी मठात देवदर्शन घेऊन मठाच्या सन्मानाचा स्विकार केला. मठातर्फे श्री शंकराचार्य स्वामीजींच्या हस्ते निडसोसी श्रींचा आणि कंपली श्री विद्या नारायण भारती स्वामीजींचा सन्मान करण्यात आला. निडसोसी श्री पुढे म्हणाले, श्री शंकराचार्य संस्थान मठात नितिमत्ता जोमासली जात आहे. येथे धर्म सांस्कृती वाचविणेचे कार्य केले जात असल्याचे श्रींनी सांगितले. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक भाषण गिरीश कुलकर्णी यांनी केले. यावेळी मठाचे व्यवस्थापक अर्जुन कानवडे, सुहास कुलकर्णी, एम. बी. गस्ती भक्तगण उपस्थित होते.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …