संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी छोट्या दोस्तांची इलेक्ट्रीक बाईक चालविलेला व्हीडिओ चांगलाच चर्चेत दिसतो आहे. रमेश कत्ती यांच्याविषयी लोकांत एकीकडे विरोधाभास तर दुसरीकडे मोठा आदरभाव दिसतो आहे. रमेश कत्ती छोट्या मुलांची इलेक्ट्रीक बाईक चालवित असलेला व्हीडिओ पाहुण काहींनी काय हा पोरकटपणा तर बहुसंख्य लोकांनी व्हीडिओ लाईक केला आहे.
जीवन ऐसे नाव
माजी खासदार रमेश कत्ती हे प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारे आहेत. कधी ते मुलांत तर कधी वृध्दांत मिसळून रममान होऊन जातात. यात्रोत्सवात ते पीपी वाजवून मजा घेतात. मुलांच्या खेळात आणि युवकांच्या क्रिकेट सामन्यांत त्यांचा सहभाग असतो. परवा त्यांनी भजनाचा आनंद तर आता मुलांच्या इलेक्ट्रीक बाईक फिरविणेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. रमेश कत्ती हे जीवनाचा पुरेपूर आनंद लुटणारे व्यक्तीमत्व असल्याची चर्चा लोकांतून केली जात आहे. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधून आनंदाने जगणे यालाच जीवन ऐसे नाव म्हटले जाते. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला बालपणाच्या गोड आठवणी कायम स्मरणात राहतात. आजकालच्या धक्काधक्कीच्या संघर्षमय जीवनात प्रत्येक व्यक्ती देवाकडे बालपण देगा देवा, अशी मागणी निश्चितच करत आहे. मग रमेश कत्ती बालपणात रमले तर बिघडले कुठे?
Belgaum Varta Belgaum Varta