संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात काल सोमवार दि. २१ रोजी चोराने बाईक सोडून पळ काढल्याची घटना घडली आहे. याविषयीची समजलेली माहिती अशी, श्री भवानी मंदिर कळसारोहण समारंभाला उपस्थित राहिलेले शंकरलिंग सौहार्द सहकारी संस्थेचे सेक्रेटरी श्रीकांत गायकवाड यांची होंडा ॲक्टीवा मोटारसायकल चोरांनी कांही अंतरापर्यंत घेऊन जाऊन दुचाकी सोडून पळ काढला आहे. संकेश्वरात अलिकडे चोरीच्या घटना घडू लागल्याने लोकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीकांत गायकवाड यांनी विठ्ठल मंदिर जवळ आपली होंडा ॲक्टीवा लाॅक करुन समारंभाला गेले होते. समारंभ आटोपून बाहेर आलेनंतर त्यांना दुचाकी गायब झालेली दिसली. श्रीकांत बाईकचा शोध घेऊ लागल्याने लोकांना चोरीचा प्रकार समजला. श्रीकांत यांचे मित्र बाईक शोधत कांही अंतरावर गेले असता श्रीकांत यांची बाईक रस्त्याशेजारी दिसून आली. लागलीच त्यांनी श्रीकांत यांना बोलावून बाईक ताब्यात घेण्यास भाग पाडले.
Belgaum Varta Belgaum Varta