संकेश्वर : माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, मंत्री उमेश कत्तीं-आपण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोंत. यात दुमत नाही. राजकारणात त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा आहे. आमचे राजकारणात आमची तत्वे भलेही वेगळी असली तरी आमच्यात कसलेच मतभेद नाहीत. यापूर्वी राज्यांचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली होती. कत्ती – ए.बी. यांच्या अशा सांगण्यामुळे कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडलेले दिसताहेत.
कत्तींना फायदा, ए. बी.ना नुकसान
कत्ती-ए. बी. एकाच नाण्याचे दोन बाजू असल्याच्या गोष्टींचा फायदा मंत्री उमेश कत्तीं यांना भरपूर झालेला दिसत आहे. ए. बी. पाटील यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत कार्यकर्तेंना फोडण्यात उमेश कत्ती सफल झालेले दिसत आहेत. ए. बी. यांचे धरसोडवृतीचे राजकारण त्यांना चांगलेच महागात पडलेले दिसताहे. ए. बी. यांचे बरेच निष्ठावंत कार्यकर्ते कत्तींच्या गटात सहभागी झाल्याने उमेश कत्ती राजकारणात वरचढ ठरलेले दिसत आहेत. हुक्केरी तालुक्यातील सर्व सहकारी संघ-संस्थांवर कत्ती गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे ए. बी. यांची बाजू लंगडी झालेली दिसत आहे. कत्ती बंधूंच्याबाबत संकेश्वर-हुक्केरीतील मतदारांत नाराजीचा सूर दिसतो आहे. तो कमी करण्यासाठी कत्ती बंधू प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत ए. बी. पाटील विरोधात उमेश कत्ती आखाड्यात उतरल्यास उमेश कत्तींचं विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण विधानसभेची जय्यत तयारी कत्ती बंधूंनी गेल्या दोन वर्षांपासून चालविलेली दिसत आहे. निवडणूक घोषीत झाल्यानंतर ए. बी. पाटील खडबडून जागे होऊन चालणार नाहीय. विधानसभेच्या आखाड्यात उतरायचे असेल तर त्यांना मोठी तयारी करावी लागणार आहे.