Sunday , December 7 2025
Breaking News

लक्ष्य सेन चमकला; बॅडमिंटनमध्ये भारताला आणखी एक सुवर्ण

Spread the love

 

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूनी चमकदार कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने सुवर्णपदक पटकावले. तिच्यापाठोपाठ लक्ष्य सेननेदेखील धडाकेबाज खेळू करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. लक्ष्यने पुरुष एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे.
मलेशियाचा त्झे योंग एनजी आणि भारताचा लक्ष्य सेन यांच्यादरम्यान पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात लक्ष्यने एनजीचा 21-19, 21-9, 21-16 अशा फरकाने पराभव केला. मलेशियाचा खेळाडू जखमी झालेला असूनही त्याने लक्ष्यला कडवी झुंज दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे लक्ष्येचे पहिले सुवर्ण पदक ठरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *