वॉशिंग्टन : टेनिस क्षेत्रावर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारी दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने मंगळवारी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. 23 ग्रँड स्लॅम विजेती अमेरिकन खेळाडू सेरेना म्हटले की ती खेळापासून “दूर होत आहे”.
40 वर्षीय टेनिस स्टारने सांगितले, की ती काय करत आहे याचे वर्णन करण्यासाठी सर्वोत्तम शब्द म्हणजे “उत्क्रांती” हाच आहे. तसेच आपल्याला आता कुटुंब वाढवायचे आहे. “मला निवृत्ती हा शब्द कधीच आवडला नाही. तो मला आधुनिक शब्दासारखा वाटत नाही. मी निवृत्तीकडे संक्रमण म्हणून पाहते.
या वर्षाच्या सुरुवातीला विम्बल्डन स्पर्धेत पहिल्याच फेरीत सेरेनेचे आव्हान संपुष्टात आले होते. मात्र तिने आता यूएस ओपनवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. अखेरच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केल्याचं सेरेनाने म्हटलं आहे. अर्थातच ती युएस ओपननंतर निवृत्त होणार आहे.
सेरेना पुढं म्हणाली की, “दुर्दैवाने मी यावर्षी विम्बल्डनसाठी तयार नव्हते. मला हेही माहित नाही की मी युएस ओपन जिंकण्यासाठी तयार आहे की नाही. पण मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.
सेरेनाने कारकिर्दीत एकेरीमध्ये 23 ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत, जे खुल्या स्पर्धेतील एका खेळाडूने जिंकलेले सर्वाधिक आहेत. सेरेना महिला टेनिसच्या क्रमवारीत सलग ३१९ आठवडे अव्वल होती.