Tuesday , March 3 2026
Breaking News

जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता कायम : सौरभ गांगुली

Spread the love

 

नवी दिल्ली : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता कायम आहे असे संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सौरव गांगुलीने जसप्रीत बुमराहबाबत आशा कायम आहेत. तो विश्वचषकात खेळू शकतो, असे वक्तव्य केले आहे.
विश्वचषकाला दोन ते तीन आठड्याचा कालावधी राहिला आहे. त्यापूर्वीच जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याची चर्चा माध्यमात रंगली. बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी जसप्रीत बुमराह विश्वचषकाबाहेर गेल्याचे वृत्त दिले. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने या वृत्ताचे खडंन करत बुमराहच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा कायम असल्याचे संकेत दिले.
जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे. त्याशिवाय त्याची दुखापत लवकर बरी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच बीसीसीआयने अद्याप जसप्रीत बुमराहच्या बदली गोलंदाजाचे नाव जाहीर केले नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह अद्याप विश्वचषकात खेळण्याची आशा कायम असल्याचे वृत्त आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *