मेलबर्न : विराट कोहलीची ‘विराट’ इनिंग आणि त्यानं हार्दिक पंड्यासोबत केलेली शतकी भागीदारी याच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात 4 विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियाची सरशी झाली. नाबाद 82 धावा करणारा विराट कोहली भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थानं नायक ठरला. पाकिस्ताननं या सामन्यात भारतासमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं अखेरच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर विजयी लक्ष्य गाठलं आणि खऱ्या अर्थानं मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली.
दरम्यान, पाकिस्तानचा डाव 159 धावांवर आटोपला आहे. भारताकडून हार्दीक आणि अर्शदीपने अप्रतिम गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत. पण पाकिस्तानकडून शान मकसून आणि इफ्तिकार अहमदने अर्धशतकं ठोकत पाकिस्तानचा डाव सावरला आहे. आता भारताला 20 षटकांत विजयसाठी 160 धावा करायची गरज आहे.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला भारतासमोर आधी फलंदाजी करणं अवघड ठरत असल्यानं रोहितनं हा निर्णय घेतला. त्यानुसारच भारतीय गोलंदाजांनी सुरुवातही दमदार केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबरला 0 धावांवर तंबूत धाडत अर्शदीपने पहिली विकेट घेतली. त्यानंतरही भारताने गोलंदाजी कसून सुरुच ठेवली. 4 धावा करुन रिझवानही बाद झाला. पण त्यानंतर शान मकसूद (52) आणि इफ्तिकार अहमद (51) यांनी डाव सावरला आणि दोघांनी दमदार अर्धशतकं ठोकत पाकिस्तानची धावसंख्या सावरली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 8 चेंडूत 16 धावांची खेळी करत आणखी योगदान दिलं. ज्यामुळे पाकिस्तानने 159 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद शमी बुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Belgaum Varta Belgaum Varta