मुंबई : बँकॉकमध्ये सुरु असलेल्या उबेर कप स्पर्धेत भारताने अमेरिकेला 4-1ने हरवलं आहे. यामुळे पीव्ही सिंधू आता उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या ड गटातील लढतीत पीव्ही सिंधू जेनी गाईविरुद्ध खेळायला सुरुवात केली. सिंधूने दोन्ही खेळात आपलं वर्चस्व राखलं आणि 26 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-10, 21-11 असा विजय मिळवला आहे. दुसऱ्या लढतीत तनिषा क्रास्टो आणि ट्रीसा जॉली या महिला दुहेरी जोडीने फ्रान्सिस्का कॉर्बेट आणि अॅलिसन ली हीचा 21-19, 21-10 असा 34 मिनिटे चालेल्या खेळात पराभव केलाय. कोरियन आणि भारतीय महिला संघ उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. बुधवारी होणारा सामना अव्वल स्थान निश्चित करेल.
Belgaum Varta Belgaum Varta