Monday , December 8 2025
Breaking News

शुबमन गिलचा भीम पराक्रम! द्विशतक झळकावणारा ठरला जगातील सर्वात युवा फलंदाज

Spread the love

 

भारत आणि न्यूझीलंड संघांत पहिला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुबमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावले. त्याने १४९ चेंडूत २०८ धावा केल्या. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावाांचा डोंगर उभारला.

शुबमन गिलने १४९ चेंडूचा सामना करताना आपल्या खेळीत १९ चौकार आणि ९ षटकार लगावले. त्याचबरोबर तो भारताकडून वनडेत द्विशतक झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारे हे पाच भारतीय खेळाडू

सचिन तेंडुलकर २००* वि. दक्षिण आफ्रिका २०१०
वीरेंद्र सेहवाग २१९ वि. वेस्ट इंडीज २०११
रोहित शर्मा २०९ वि. ऑस्ट्रेलिया २०१३
रोहित शर्मा २६४ वि. श्रीलंका २०१४
रोहित शर्मा २०८* वि. श्रीलंका २०१७
इशान किशन २१० वि. बांगलादेश २०२२
शुभमन गिल २०८ वि. न्यूझीलंड २०२३

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *