नवी दिल्ली : भारताचा खेळाडू के एल राहुल आपली प्रेयसी अभिनेत्री आथिया शेट्टीबरोबर विवाह बंधनात अडकला आहे. त्यातच आणखी एका भारतीय खेळाडूची विकेट पडली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने लग्नगाठ बांधली आहे. अक्षर पटेलने प्रेयसीशी विवाह केला आहे. याचे फोटो समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहेत.
अक्षर पटेल आणि त्याची प्रेयसी मेहा पटेल गुरुवारी (26 जानेवारी) विवाह बंधनात अडकले. गुजरातमधील वडोदरा येथे पारंपारिक पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पाहर पडला. त्यापूर्वी बुधवारी (25 जानेवारी) अक्षर पटेल आणि मेहा पटेल यांचा मेहंदी कार्यक्रम पार पडला होता.
अक्षर पटेलच्या लग्नात खेळाडू जयदेव उनाडकटने आपल्या पत्नीसह हजेरी लावली होती. याचा फोटो जयदेव उनाडकटने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
दरम्यान, अक्षर पटेल आणि मेहा पटेल अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. अक्षरची पत्नी मेहता ही एक प्रोफेशनल डायटीशियन आहे. मेहा पटेलने आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक डाएट प्लॅन शेअर केले आहेत. याशिवाय ती डाएटशी संबंधित माहिती देखील शेअर करत असते.
Belgaum Varta Belgaum Varta