Tuesday , March 3 2026
Breaking News

श्रेयस अय्यर पहिल्या कसोटीतून बाहेर! सूर्यकुमारला पदार्पणाची संधी

Spread the love

 

 

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाच्या मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या गैरहजेरीत भारतीय संघ व्यवस्थापन शुबमन गिलला पसंती देऊन मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला खेळवण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या घरच्या मालिकेतून बाहेर पडलेला अय्यर दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. सध्या तो बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *