नवी दिल्ली : भारताची स्टार जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर अपात्रतेसह 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. दीपने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याने ही कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय तपासणी यंत्रणेच्या चाचणीत दीपाने हायजेनामाइनचे सेवन केल्याचे आढळले. दीपावर करण्यात आलेली ही कारवाई 10 जुलै 2023 पर्यंत लागू असेल. आयटीएने दिलेल्या माहितीनुसार एफआयजी अँटी डोपिंग नियमांच्या कलम 10.8.8 नुसार या प्रकरणाची सुनावणी झाली.
काय आहे हायजेनामाईन
युनायटेड स्टेट्स अँटी डोपिंग एजेंसीनुसार हायजेनामाईन मिश्रीत एड्रीनर्जिक रिसेप्टर आहे. हे उत्तेजक म्हणून काम करते. वाडाने 2017 साली बंदी घातलेल्या पदार्थांच्या यादीत याचा समावेश केला होता. हायजेनामाईन हे दम्याविरोधी म्हणून वापरले जाते. याचा वापर कार्डियोटोनिक म्हणून देखील केला जातो. यामुळे हृदयची गती मजबूत करण्यासाठी केला जातो.
कोण आहे दीपा कर्माकर
दीप भारताची आघाडीची जिम्रॅस्ट आहे. त्रिपूराच्या दीपाने 2016 साली रियो ऑलिंम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवले होते. 2018 साली तिने तुर्कीच्या मर्सिन येथे झालेल्या वर्ल्डकप चॅलेंज कपमध्ये वॉल्ट स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली होती.