सिडनी : ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार अॅरॉन फिंचने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फिंचने वनडे आणि कसोटीआधीच निवृत्ती घेतली होती. पण आता त्याने टी-20 क्रिकेटलाही अलविदा केला आहे. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. फिंचने 12 वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळले आहे.
अॅरॉन फिंच तो मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणार्या खेळाडूंपैकी एक होता. फिंचने ऑस्ट्रेलियासाठी 76 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. फिंचने आपल्या कारकिर्दीत 5 कसोटी, 146 एकदिवसीय आणि 103 टी-20 सामने खेळले आहेत.
निवृत्तीची घोषणा करताना फिंच म्हणाला की, माझी अशी भावना आहे की मी यापुढे 2024 चा टी-20 विश्वचषक खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत संघाला भविष्यातील रणनीतीवर काम करता यावे, यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे.
भारताविरुद्ध खेळलेली शेवटची संस्मरणीय खेळी
नोव्हेंबर 2020 मध्ये, अॅरॉन फिंचने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावले होते. त्याने 124 चेंडूत 114 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 374 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 308 धावाच करू शकला. भारताविरुद्ध फिंचची ही शेवटची आणि मोठी संस्मरणीय खेळी होती.