नवी दिल्ली : भाजपाचे आमदार तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत जंतर-मंतर या ठिकाणी सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा आजचा 19 वां दिवस आहे. जतंर-मंतर याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला कुस्तीपटू भाजपा आमदारांच्या विरोधात काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत. कुस्तीपटूंची विरोधाची ही पद्धत सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. सोशल मिडीयावर कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बऱ्याच प्रतिक्रिया देखील येत आहेत. तसेच कुस्तीपटूंच्या भूमिकेबद्दल देखील लोकं आपली मतं मांडताना दिसत आहेत. तर काही लोकं या आंदोलनाच्या आणि ‘काळा दिवस’ साजरा करण्याच्या भूमिकेविरुद्ध देखील प्रतिक्रिया देत आहेत.
खरतर कुस्तीपटूंनी गुरुवारी बृजभूषण सिंहाविरोधात काळा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. आज कुस्तीपटू स्वत: काळी पट्टी बांधून आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंनी लोकांना हा काळा दिवस साजरा करण्यासाठी समर्थन करण्याचे आवाहन देखील केले आहे. कुस्तीपटूंच्या या भूमिकेचे पडसाद सोशल मिडीयावर पहायला मिळत आहेत. सध्या सोशल मिडीयावर काळा दिवस चांगलाच चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंनी काळा दिवस साजरा करत असल्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे.
कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा 19 वा दिवस
बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशातील महिला कुस्तीपटू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, 18 जानेवारी 2023 रोजी कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह 30 कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाचा आजचा 19 वा दिवस आहे. या आंदोलनात सामील झालेल्या सात कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याची चौकशी करण्यासाठी दोन समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, याप्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्तीपटूंमध्ये नाराजी आहे.
Belgaum Varta Belgaum Varta