Monday , December 8 2025
Breaking News

विराट कोहलीची रँकिंगमध्ये मोठी घसरण

Spread the love

 

नवी दिल्ली : आयसीसी क्रमवारीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. रँकिंगमधील विशेष बाब म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे नुकसान झाले असून एका नव्या खेळाडूचा रँकिंगमध्ये प्रवेश झाला आहे. मात्र, पहिला पाच क्रमांकांमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. टी-20 क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव चमकत आहे आणि तो अजूनही चांगल्या आघाडीसह अव्वल स्थानावर आहे.

आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत बाबर आझम पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे रेटिंग आता 886 वर गेले आहे. तर रॅसी व्हॅन डर डुसेन 777 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ फखर जमान (755 रेटिंग) तिसऱ्या, इमाम-उल-हक (745)चौथ्या क्रमांकावर आहेत. यानंतर टीम इंडियाचा शुभमन गिल पाचव्या स्थानी कायम असून त्याचे रेटिंग 738 आहे.

ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 726 आहे. दरम्यान, आयरिश खेळाडू हॅरी ट्रॅक्टर याने टॉप 10 मध्ये धडक मारली आहे. तो 722 रेटिंगसह थेट सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. याचा फटका विराट कोहलीला बसला आहे. कोहलीची 719 च्या रेटिंगसह आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्याचवेळी क्विंटन डिकॉकलाही एका स्थानाचे नुकसान झाले असून तो नवव्या क्रमांकावर आला आहे. टॉप 10 मध्ये रोहित शर्माचे स्थान अबाधित असून तो 707 च्या रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे.
आयसीसी वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत जोश हेझलवूड अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 705 आहे. तर टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 691 रेटिंगसह दुसऱ्या अणि मिचेल स्टार्क 686 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे.

मोहम्मद सिराजशिवाय टीम इंडियाचा कोणताही खेळाडू टॉप 10 गोलंदाजांच्या यादीत नाही. मॅट हेन्री 667 रेटिंगसह चौथ्या तर ट्रेंट बोल्ट 660 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. वनडे क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या अव्वल स्थानावरचा ताबा बांगलादेशी शाकिब अल हसनने सोडलेला नाही. तो 367 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. मोहम्मद नबी 310 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राशिद खानचे रेटिंग 280 असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिकंदर रझा चौथ्या आणि झीशान मकसूद पाचव्या क्रमांकाच्या आहेत. या यादीत टीम इंडियाचा एकही खेळाडू नाही.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *