Sunday , December 22 2024
Breaking News

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी यशस्वी जयस्वालची भारतीय क्रिकेट संघात वर्णी

Spread the love

 

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालचं नशीब फळफळलं आहे. यशस्वी जयस्वालची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघात वर्णी लागली आहे. टीम इंडियामध्ये ऋतुराज गायकवाडच्या जागी स्टँडबाय खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली आहे.

यशस्वी जयस्वालचं नशीब फळफळलं, टीम इंडियात वर्णी
यशस्वी जायस्वालचा आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऋतुराज गायकवाडच्या जागी स्टँडबाय खेळाडू म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाडचं 3 जून 2023 ला लग्न होणार आहे, यामुळे आता यशस्वी जयस्वालला संघात संधी देण्यात आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी यशस्वी जयस्वालची निवड
बीसीसीआयने ऋतुराज गायकवाडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी स्टँडबाय सलामीवीर म्हणून टीम इंडियामध्ये समाविष्ट केलं होतं. पण ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, ऋतुराज गायकवाडने बीसीसीआयला माहिती दिली आहे, की तो 5 जूननंतरच संघात सामील होऊ शकेल. दरम्यान, यशस्वी जयस्वाल यांच्याकडे यूकेचा व्हिसा असल्याने तो संघात सामील होऊ शकेल. येत्या काही दिवसांत लंडनला जाणार आहे.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ‘द ओव्हल’ येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये 7 जून 2023 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर, मोहम्द शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)

अतिरिक्त खेळाडू : ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपसाठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

About Belgaum Varta

Check Also

आर. अश्विन आणि जडेजाने लाज राखली, पहिल्या दिवशी भारताच्या 6 बाद 339 धावा

Spread the love  चेन्नई : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *