Tuesday , March 3 2026
Breaking News

चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता, धोनीचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन

Spread the love

 

अहमदाबाद : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं गुजरात टायटन्सचा पराभव केला. चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरला आहे. कणर्धार धोनीचा संघ पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियन ठरला आहे. चेन्नईला विजयासाठी 171 धावांचं आव्हान होतं. जडेजाने शेवटच्या शतकात कमाल खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन चेंडून 10 धावांची गरज असताना जडेजाने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर चौकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला.

रोमांचक सामन्यात चेन्नईचा विजय
चेन्नई आणि गुजरातच्या सामन्यात आजही पावसाने ख्वाडा घातला. त्यामुळे जवळपास तीन तासांचा खेळ वाया गेला. पंचांनी दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. 12.10 वाजता सामन्याला सुरुवात झाली. गुजरातनं 20 षटकांत 214 धावा केल्या. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला नवीन टार्गेट देण्यात आलं. चेन्नईला 171 धावांचं आव्हान देण्यात आलं आणि सुपर किंग्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

शेवटच्या चेंडूवर जडेजाच्या चौकारासह चेन्नईचा विजय
साई सुदर्शन याच्या झंझावाती 96 धावांच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबद्लयात 214 धावांपर्यंत मजल मारली. साई सुदर्शनशिवाय वृद्धीमान साहा याने 54 धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून मथिशा पथीराना याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. चेन्नईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान आहे. पण सामन्याला पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान देण्यात आलं होतं. रोमांचक अशा अंतिम सामन्यात चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

अखेरच्या षटकापर्यंत रोमांचक ठरला अंतिम सामना
चेन्नई संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. गुजरातकडून शेवटच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी मोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. मोहितने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतर शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फक्त चेन्नईला फक्त एक धाव काढता आली. त्यानंतर चेन्नईला 4 चेंडूत 12 धावांची गरज होती. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर एक-एक धावा मिळाली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर जडेजाने शानदार षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार ठोकत चेन्नईनं अंतिम सामना जिंकला.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *