Sunday , July 26 2026
Breaking News

भगव्याची शान राखणाऱ्या “त्या” बालकाचा सत्कार!

Spread the love

 

बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील कॉर्नर जवळील असलेली कमान ध्वजासहित पडली असताना आनंदवाडी येथील श्री खर्डेकर या बालकाने भर पावसात धाव घेत भगवा ध्वज हाती घेऊन सुरक्षित ठेवला. या बालकावर झालेले संस्कार, ध्वजावरील प्रेम तसेच ध्वजाबद्दल असलेला अभिमान हे कौतुकास्पद आहे. त्यानिमित्ताने बालकाचे आनंदवाडीतील सर्व महिलांच्या वतीने श्री याला चांदीची चैन, शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गल्लीतील सर्व महिला, युवक मंडळ व बाल चमूकले हे सर्व उपस्थित होते. त्याचबरोबर समाजसेवक वैभव खाडे यांनी श्री या बालकाचा दोन वर्षाचा शाळेचा खर्च आपण देऊ असे यावेळी सांगितले. यानंतर समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी जनतेला आवाहन करत म्हणाल्या की, श्री हा मुलगा एक गरीब कुटुंबातील आहे. तीन महिन्यापूर्वीच श्री च्या वडिलांचे निधन झाले. आई घर काम करून मुलांचे सांभाळ करते. श्री चे कुटुंब भाडोत्री घरामध्ये वास्तव्यास आहे. त्याकरिता ध्वजाचा अभिमान आणि ध्वजाचे संरक्षण करणाऱ्या श्री ला दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे अशी विनंती यावेळी करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *