Monday , December 8 2025
Breaking News

जागतिक कसोटी अजिंक्यपद पराभवानंतर राहुल द्रविडला चेतावणी, बीसीसीआय मोठा निर्णय घेणार?

Spread the love

 

नवी दिल्ली : दशकभरापासून टीम इंडियाने एकही आयसीसी चषक उंचावलेला नाही. भारतीय संघाने फायनलपर्यंत धडक मारली, पण जेतेपदासून दूरच राहिला. ओव्हलवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियावर टीकेची झोड उडत आहे. कोच राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टापवरही निशाणा साधलाय. मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच, बीसीसीआयने राहुल द्रविड याच्यासह सपोर्ट स्टाफला चेतावणी दिली आहे. इनसाइड स्पोर्ट्सने याबाबतचे वृत्त दिलेय.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अतिंम सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर इनसाइड स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल द्रविडसह सपोर्ट स्टापला वॉर्निंग दिली आहे. 2023 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून आता झालेल्या पराभवानंतर चेतावणी दिली आहे. फलंदाजी कोच विक्रम राठोड आणि गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे यांची उचलबांगडी होण्याची चर्चाचही सुरु झाली आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणे सोपं नाही. टीम इंडियाने तो पराक्रम केलाय. पण विदेशी खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी समाधानकारक नाही. हे सर्व सुरु असताना वनडे विश्वचषकही डोळ्यासमोर ठेवावा लागले. विश्वचषकाला अवघे चार महिने बाकी आहेत.कोणताही विचार न करता प्रतिक्रिया देणं चुकीचे आहे. पण याबाबत अंतर्गत चर्चा सुरु आहे, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

राहुल द्रविड 2023 च्या विश्वचषकापर्यंत टीम इंडियाचे प्रमुख कोच म्हणून काम पाहतील. त्यानंतर त्यांचा करार संपुष्टात येणार आहे. आशिया चषक, टी20 वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पराभवानंतरही बीसीसीआयने राहुल द्रविड यांच्यावर विश्वास दाखवलाय. 2023 च्या विश्वचषकानंतर राहुल द्रविडच्या कोचिंगबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे समोर आलेय. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या मानहाणीकारक पराभवानंतर कोचसह सपोर्ट स्टाफलाही वॉर्निंग देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *