Monday , December 8 2025
Breaking News

टॉप रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा, ट्रॅव्हिस हेड-स्टीव्ह स्मिथची झेप!

Spread the love

 

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपनंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मात देत विजेतेपदावर नाव कोरले. त्याचबरोबर ताज्या टेस्ट रँकिंगमध्येही त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. खेळाडूंच्या रँकिंगमध्ये टॉपच्या जागी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाच दबदबा पहायला मिळत आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांना जबरदस्त फायदा मिळवला आहे, तर बाबर आझम, केन विल्यमसन आणि जो रूट यांना मोठे नुकसान झाले आहे. तब्बल 39 वर्षांनी एकाच देशाचे तीन खेळाडू टॉप-3 मध्ये आले आहेत. 1984 मध्ये वेस्ट इंडिजचे गॉर्डन ग्रीनिज, क्लाइव्ह लॉईड आणि लॅरी गोमेझ यांनी कसोटी क्रमवारीत अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले होते.

मार्नस लॅबुशेन कसोटीत नंबर वन
कसोटीत मार्नस लॅबुशेन 903 रेटिंगसह अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. यानंतर स्टीव्ह स्मिथचा क्रमांक लागतो, ज्याच्या खात्यात 885 रेटिंग जमा झाले आहेत. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात स्मिथने फटकावलेल्या शतकाचा त्याला चांगला फायदा झाला. ट्रॅव्हिस हेडने त्याने तीन स्थानांनी झेप घेतली असून तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग स्टीव्ह स्मिथपेक्षा फक्त एकने कमी आहे. केन विल्यमसन अनपेक्षितपणे चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग आता 883 झाले आहे. त्याला दोन स्थानांचे नुकसान सहन कारावे लागले आहे. केनशिवाय बाबर आझमलाही स्थान गमवावे लागले आहे. त्याचे रेटिंग आता 862 झाले असून तो पाचव्या क्रमांकावर घसरला आहे.

जो रूट (861) सहाव्या, डॅरिल मिशेल (792) सातव्या, दामुथ करुणारत्ने (780) आठव्या, उस्मान खजाजा नवव्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत हा टॉप 10 मध्ये असणारा भारताचा एकमेव फलंदाज आहे. त्याचे रेटिंग 758 आहे. दुखापतीमुळे तो मैदानापासून दूर असला तरी त्याचे स्थान कायम आहे.

गोलंदाजी क्रमवारीत अश्विन पहिला
आयसीसीच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने रविचंद्रन अश्विनला डब्ल्यूटीसीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली नसली तरी तो अजूनही 860 रेटिंगसह नंबर वनच्या खुर्चीवर विराजमान आहे. यानंतर जेम्स अँडरसन (850) दुसऱ्या, पॅट कमिन्स (829) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कागिसो रबाडा 825 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर शाहीन शाह आफ्रिदी आहे. ज्याचे रेटिंग 787 आहे. ऑली रॉबिन्सन सहाव्या, नॅथन लायन सातव्या, जसप्रीत बुमराह (772) आठव्या, रवींद्र जडेजा नवव्या तर स्टुअर्ट ब्रॉड दहाव्या क्रमांकावर आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *