Thursday , November 21 2024
Breaking News

बीसीसीआयमध्ये सावळा गोंधळ! ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव, ना मोठा रेकॉर्ड आणि तेच निवडतात भारतीय क्रिकेट टीम!

Spread the love

 

नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की निवडकर्त्यांकडे ना दृष्टीकोन आहे, ना खेळाचे सखोल ज्ञान आहे, ना क्रिकेटची समज आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाच्या निवड समितीच्या अनुभवावर प्रश्न उपस्थित होत आहेत. चेतन शर्मा यांना हटवल्यानंतर शिव सुंदर दास यांना हंगामी मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले. त्यांच्यासोबत सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ हे निवड समितीत आहेत. पण आपण पाहायलं गेलं तर कळेल की त्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव फारच थोडका आहे.

काय म्हणाले दिलीप वेंगसरकर?

गेल्या दोन वर्षांत टीम इंडियाने शिखर धवनने वनडेमध्ये अनेक वेळा कर्णधारपद भूषवले होते. रोहित, विराट आणि राहुल आऊट असताना हे केले गेले. दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले आहे की, ‘दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गेल्या ६-७ वर्षांत मी जे निवडक पाहिले आहेत त्यांच्याकडे ना दूरदृष्टी आहे, ना खेळाचे सखोल ज्ञान आहे, ना क्रिकेटची समज आहे. त्यांनी शिखर धवनला भारताचा कर्णधार बनवले. हीच ती वेळ होती जिथे तुम्ही भविष्यातील कर्णधार तयार करू शकता.

कोणाकडे किती अनुभव

भारताचा माजी सलामीवीर शिवसुंदर दास यांच्याकडे केवळ २३ कसोटी आणि ४ वनडे सामने आहेत. दुसरीकडे, पाटणामध्ये जन्मलेल्या सुब्रतो बॅनर्जी यांनी भारतासाठी १ कसोटी आणि ६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोलाने सचिन तेंडुलकरसोबत कसोटी पदार्पण केले. पण नंतर तो चित्रपटांकडे वळला. कुरुक्षेत्र या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. अनेक टीव्ही मालिकांसोबतच तो बिग बॉससारख्या रिअलिटी शोमध्येही दिसला आहे. त्याने १ कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळले आहेत.

श्रीधरन यांना आंतरराष्ट्रीय अनुभव नाही

तामिळनाडूचे माजी क्रिकेटपटू श्रीधरन शरथ यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यांनी १३९ प्रथम श्रेणी आणि ११६ लिस्ट ए सामने खेळले आहेत. तमिळनाडूसाठी १०० रणजी सामने खेळणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. या निवड समितीतील तो एकमेव खेळाडू आहे ज्याला टीम इंडियाकडून खेळण्याचा अनुभव नाही. त्याचबरोबर टी-२० आंतरराष्ट्रीय खेळाचा अनुभव कोणालाच नाही.

बडे बडे खेळाडू निवडकर्ता होते

२०११ च्या विश्वचषकादरम्यान मुख्य निवडकर्ता असलेले कृष्णमाचारी श्रीकांत यांनी १८९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते आणि दिलीप वेंगसरकर यांनी ११६ कसोटी सामने खेळले आहेत. धोनीची निवड करणाऱ्या किरण मोरे यांना जवळपास १५० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव होता. मात्र त्यानंतर अनुभवी नावे निवड समितीत आली नाहीत. यापूर्वी चेतन शर्मा भारताचे मुख्य निवडकर्ता होते. ज्यांना केवळ २३ कसोटींचा अनुभव होता. त्यांच्या आधी असलेले सुनील जोशी यांना १५ कसोटी तर एमएसके प्रसाद यांना ६ कसोटींचा अनुभव होता.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *