Saturday , September 21 2024
Breaking News

क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या आकस्मिक मृत्यूशी कोविड लसीचा संबंध?

Spread the love

 

एका अहवालात डॉक्टरांचा खळबळजनक दावा

मेलब : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी लेगस्पिनर, फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा शेन वॉर्न याच्या मृत्यूवरुन अनेक प्रश्न उपस्थित झालेत. आता पुन्हा एकदा त्याच्या मृत्यूवरुन चर्चा रंगल्या आहेत. वॉर्नच्या मृत्यूशी संबंधित एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण कोरोनाची लस असू शकते, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्ननं कोरोनाची जी लस घेतली होती, त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार जडण्याचा धोका असल्याचं डॉक्टरांनी अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन झाला होता.

विशेष म्हणजे, शेन वॉर्नला थायलंडमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. मृत्यूच्या सुमारे 9 महिने आधी त्यानं कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. शेन वॉर्नला मिळालेली कोरोना लस हृदयाशी संबंधित आजार वाढवते, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर आणि भारतीय वंशाच्या ब्रिटिश कार्डिओलॉजिस्टनी या अहवालात शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण कोरोनाची लस असू शकते, असं म्हटलं आहे.

शेन वॉर्नला COVID mRNA लस मिळाली होती. या लसीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक वाढते. वॉर्नला त्याच्या मृत्यूच्या सुमारे 9 महिने आधी ही लस देण्यात आली होती. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. असीम मल्होत्रा ​​आणि डॉ. ख्रिस नील यांनी सांगितलं की, कोविड mRNA लसीमुळे कोरोनरी रोगाचा झपाट्यानं प्रसार होऊ शकतो. विशेषत: ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित आजार आहेत, त्यांना लस घेतल्यानंतर धोका अधिक वाढतो.

डॉक्टर मल्होत्रा यांनी बोलताना सांगितलं की, “ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्नला वयाच्या 52 व्या वर्षी अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सर्वांनाच माहीत आहे की, शेन वॉर्नची लाईफस्टाईल तशी फारशी हेल्दी नव्हती. वॉर्न स्मोकिंग करत असे आणि त्याचं वजनही जास्त होतं. माझ्या वडिलांचा मृत्यूही फायझर वॅक्सिनचे दोन डोस घेतल्यानंतर झाला होता. एवढंच नाहीतर त्यांच्या हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये वॅक्सिन घेतल्यानंतर वेगानं वाढ झाली होती.”

About Belgaum Varta

Check Also

भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर

Spread the love  नवी दिल्ली : टीम इंडियाचा ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *