Sunday , December 7 2025
Breaking News

“…तर मी खूप निराश होईन”, रवी शास्त्रींचे संजू सॅमसनबद्दल मोठं वक्तव्य

Spread the love

 

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचा वनडे आणि कसोटी संघ जाहीर केला आहे. त्यापैकी वनडे संघात संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे. यावर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. रवी शास्त्री म्हणाले की, विंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय संघात स्थान मिळवणाऱ्या संजू सॅमसनला अद्याप त्याच्या पूर्ण क्षमतेची जाणीव झालेली नाही.

माजी अष्टपैलू रवी शास्त्री पुढे म्हणाले की, या वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात भारतीय इलेव्हनमध्ये किमान दोन डावखुरे फलंदाज बघायचे आहेत. विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवली जाईल, ज्याचे वेळापत्रक या महिन्याच्या २७ तारखेला आयसीसी जाहीर करू शकते.

रवी शास्त्री द वीकशी संजू सॅमसनबद्दल बोलताना म्हणाले की, या फलंदाजाला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची क्षमता अजून कळलेली नाही. त्याला त्याची क्षमता कळली नाही, तर माझी खूप निराशा होईल. संजू हा सामना जिंकवून देणारा फलंदाज आहे, पण त्याच्याकडून हे पहायला मिळत नाही. जर त्याने आपली कारकीर्द चमकदारपणे संपवली नाही, तर मी खूप निराश होईल. माझ्या प्रशिक्षकाच्या कार्यकाळातही अशी परिस्थिती होती. जर रोहित माझ्या संघात नियमित कसोटी खेळाडू म्हणून खेळला नसता, तर माझी निराशा झाली असती. त्यामुळे संजूबद्दलही माझी अशीच भावना आहे.”

या माजी अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, उजव्या-डाव्या हाताच्या फलंदाजांच्या जोडीने टीम इंडिया योग्य संतुलन साधू शकते. शास्त्री म्हणाले, “पहिल्या सहा फलंदाजांमध्ये संघात किमान दोन डावखुरे फलंदाज असावेत, अशी माझी इच्छा आहे. आपल्याला संघात योग्य संतुलन साधण्याची गरज असेत. तुम्हाला असे वाटते का की डावखुरा फलंदाज शीर्षस्थानी अतंर निर्माण करेल? यासाठी सलामीवीर असण्याची गरज नाही, पण तो अव्वल तीन-चार फलंदाजांमध्ये असायला हवा. आपल्याला सर्व पर्यायांचा विचार करावा लागेल. मला अव्वल सहा फलंदाजांमध्ये दोन लेफ्टी फलंदाज पाहायला आवडेल.”

रवी शास्त्री पुढे म्हणाले, “सध्या देशात उच्च दर्जाचे डावखुरे फलंदाज आहेत आणि संघातील कोणत्याही वरिष्ठ खेळाडूची जागा घेण्यास ते तयार आहेत. तुमच्याकडे इशान किशन आहे. विकेटकीपिंगमध्ये तुमच्याकडे संजू सॅमसन आहे, पण लेफ्टी बॅट्समनमध्ये तुमच्याकडे जैस्वाल, टिळक वर्मा आहेत. दोघेही असे फलंदाज आहेत जे वरिष्ठ खेळाडूंची जागा घेऊ शकतात.”

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *