ढाका : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघ्या तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहेत. त्याआधीच बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार तमीम इकबाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आफगाणिस्तानविरोधात झालेल्या मानहाणीकारक पराभवानंतर तमिम इकबाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तीन महिन्यानंतर भारतामध्ये विश्वचषक होणार आहे, त्यापूर्वीच नियमीत कर्णधाराने निवृत्ती घेतल्यामुळे बांगलादेशच्या अडचणी वाडल्या आहेत. 5 ऑक्टोबर 2023 पासून भारतात वनडे एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यादरम्यान एकदिवसीय मालिका सुरु आहे. यामध्ये तमीम इकबाल बांगलादेश संघाचे नेतृत्व करत होता. तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना 5 जुलै रोजी बुधवारी झाला. यामध्ये बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार आफगाणिस्तानने 17 धावांनी विजय मिळवला. य सामन्यानंतर तमीम इकबाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तमीम याच्यानंतर बांगलादेशच्या संघाची धुरा कोण सांभाळणार? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
तमीम इकबाल याने पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा घेतल्याचे जाहीर केला. तडकाफडकी राजीनामा घेत तमीम इकबाल याने बांगलादेशच्या चाहत्यांना धक्का दिला. 34 वर्षीय तमीमने बांगलादेशसाठी 2007 मध्ये पदार्पण केले होते. कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामन्यात तमीमने बांगलेदशचं नेतृत्व केलेय.