डोमिनिका : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारी डोमिनिकामध्ये बुधवारी खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला काल (बुधवारपासून) सुरुवात झाली. सामन्याचा पहिल्या दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या बाजूनं होता. वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत सर्वात आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावा करुन ऑल आऊट झाला. त्यानंतर भारतानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या. टीम इंडियासाठी रविचंद्रन अश्विन हुकुमी एक्का ठरला. अश्विननं एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 विकेट्स घेत विंडिजच्या संघाचा धुव्वा उडवला. तर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रोहित आणि यशस्वीनंही आपली कमाल दाखवली.
वेस्ट इंडिजचा संघ ऑल आऊट झाल्यानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली. रोहित शर्मा आणि जशस्वी जायस्वाल यानं आपल्या धमाकेदार खेळीनं सुरुवात केली. महत्त्वाचं म्हणजे, यशस्वी जायस्वालचा हा डेब्यू सामना होता. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात यशस्वीनं 73 चेंडूंमध्ये नाबाद 40 धावा केल्या आहेत. तर टीम इंडियाचा स्टार कर्णधार रोहित शर्मानं 65 चेंडूंमध्ये नाबाद 30 धावांची खेळी केली. रोहित आणि यशस्वीनं भागीदारीमध्ये 80 धावांची खेळी केली. आज दुसऱ्या दिवशीही टीम इंडिया फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार असून रोहित आणि यशस्वी आजही आपल्या दमदार खेळीनं विंडिजला धूळ चारण्याची शक्यता आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिजहून केवळ 70 धावांनी मागे आहे.
अश्विनच्या फिरकीत अडकले वेस्ट इंडिजचे खेळाडू
डोमिनिका टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत सर्वात आधी बँटिंग करण्याचा निर्णय घेतला. सर्वात आधी बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरलेला वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावांवर ऑल आऊट झाला. टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि जाडेजा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अगदी तुटून पडले. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 47 धावा एलिकनं केल्या. त्यानं 99 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि एक षटकार लगावला. इंडिजचा कर्णधार ब्रेथवेट अवघ्या 20 धावा करुन माघारी परतला. तेजनारायण चंद्रपॉल 12 धावांवर आऊट झाला, तर कॉर्नवाल 19 धावांवर नाबाद राहिला.
टीम इंडियासाठी अश्विननं 24.3 ओव्हर्समध्ये 60 धावा देत तब्बल 5 विकेट्स घेतले. त्यानं 6 मेडन ओव्हरही काढले. अश्विनसाठी हा डाव अत्यंत खास होता. त्याचं कारण म्हणजे, टीम इंडियाच्या स्टार स्पिनरनं वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवलं, त्यासोबतच त्यानं 700 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केले. रवींद्र जाडेजानं 14 ओव्हर्समध्ये 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यानं 7 मेडन ओव्हर्स काढले. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजनंही प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta