Friday , November 22 2024
Breaking News

२० वर्षीय कार्लोस अल्कारेज विम्बल्डनचा बादशाह, जोकोविचचा पराभव करत जिंकले दुसरे ग्रँड स्लॅम

Spread the love

 

आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच याला विम्बल्डनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. २० वर्षीय कार्लोस अल्कारेज याने जोकोविचचा पराभव करत दुसरे ग्रँड स्लॅम जिंकले. अटीतटीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेज याने विम्बल्डन चॅम्पियनशीप २०२३ वर नाव कोरले. रविवारी (१६ जुलै) लंडंनमध्ये झालेल्या फायनल सामन्यात वर्ल्ड नंबर १ अल्कारेज याने अनुभवी नोवाक जोकोविच याचा पराभव केला. पाच सेटपर्यंत झालेल्या रोमांचक सामन्यात कार्लोस अल्कारेज याने १-६, ७-६ (६), ६-१, ३-६, ६-४ असा विजय मिळवला.
टेनिस विश्वातील तिसरी ग्रँडस्लॅम म्हणजेच विम्बल्डन स्पर्धा लंडन येथे खेळली गेली . स्पर्धेचा पुरुष एकेरीचा अंतिम स्पेनचा अग्रमानांकित कार्लोस अल्कारेज आणि सर्बियाच्या नोवाक जोकोविच यांच्यादजरम्यान झाला. अटीतटीच्या सामन्यात कार्लोस अल्कारेज याने नोवाक जोकोविच याचा पराभव केला. कार्लोस अल्कारेज याचे हे दुसरे ग्रँडस्लॅम होये. याआधी अल्कारेज याने गेल्यावर्षी नॉर्वेच्या कॅस्पर रूड याचा पराभव करत यूएस ओपन खिताबावर नाव कोरले होते. नोवाक जोकोविच याचे २४ वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

नोवाक आणि कार्लोस यांच्यात अटीतटीचा सामना

कार्लोस अल्कारेज आणि नोवाक जोकोविच यांच्यात अटीतटीचा सामना झाला. दोघांनीही अखेरपर्यंत झुंज दिली. पण २० वर्षीय कार्लोसने बाजी मारली. पहिल्या सेटमध्ये जोकोविच याने ६-१ ने बाजी मारली. दुसर्‍या सेटमध्ये कार्लोस अल्कारेज याने दमदार पुनरागमन केले. दुसरा सेट अल्काराज याने ७-६ च्या फरकारेन जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये एकवेळ ६-६ अशी बरोबरी झाली होती. टाय-ब्रेकर झाला, त्यामध्ये अल्काराज याने ८-६ अशी बाजी मारत सेट सेट ७-६ ने नावावर केला. त्यानंतर तिसर्‍या सेटमध्ये २० वर्षीय कार्लोस याने दमदार खेळी करत अनुभवी जोकोविच याचा ६-१ असा पराभव केला. चौथ्या सेटमध्ये जोकोविच याने आपला अनुभव पणाला लावला. चौथा सेट चोकोविच याने ६-३ च्या फरकाने जिंकला. चौथ्या सेटमध्ये सुरुवातीला जोकोविच २-० ने फिछाडीवर होता, पण त्याने आपला खेळ उंचावत सेट नावावर केला. अखेरच्या सेटमध्ये दोघांमध्ये स्पर्धा झाली. पण युवा कार्लोस अल्काराज याने ६-४ ने बाजी मारली.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *