Tuesday , March 3 2026
Breaking News

जयस्वाल, रोहित, विराटची दमदार अर्धशतके, पहिल्या दिवसाअखेर भारत 4 बाद 288 धावा

Spread the love

 

रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या दमदार सुरुवातीनंतर विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने चार विकेटच्या मोबदल्यात 288 धावा केल्या आहेत. विराट कोहली 87 आणि रविंद्र जाडेजा 36 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार अर्धशतके झळकावली.

भारताचा मध्यक्रम झटपट कोसळळा. पण विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी शतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरला. जाडेजा ८४ चेंडूवर चार चौकारासरह ३६ धावांवर नाबाद आहे. तर १६१ चेंडूत विराट कोहली ८७ धावांवर नाबाद आहे. त्याने या खेळीत आठ चौकार लगावले. विराट कोहलीने आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दमदार फलंदाजी केली.

भारताची दमदार सुरुवात 

यजमान वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी वनडे स्टाईल सुरुवात केली.पहिल्या कसोटी सामन्यात द्वितकी भागिदारी करणारे रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्या कसोटी सामन्यातही या जोडीने दमदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 139 धावांची भागिदारी केली.

जयस्वाल, रोहित, विराटची दमदार अर्धशतके 

रोहित शर्माने 80 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत रोहित शर्माने दोन षटकार आणि 9 चौकार लगावले. रोहित शर्मा याचं शतक अवघ्या 20 धावांनी हुकले. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले होते, दुसऱ्या कसोटी सामन्यात 80 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल याने पहिल्या कसोटी सामन्यात दीडशतकी खेळी केली होती. पदार्पणात यशस्वीने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. दुसऱ्या सामन्यातही यशस्वीने दमदार फलंदाजी केली. यशस्वी जयस्वाल याने अर्धशतकी खेळी केली. यशस्वी जयस्वाल याने 74 चेंडूमध्ये 57 धावांची खेळी केली. या खेळीत जयस्वालने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला.

अजिंक्य-गिल यांचा फ्लॉप शो 
शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांना दुसऱ्या कसोटीमध्येही मोठी खेळी करता आली नाही. या दोघांनी निराश केले. शुभमन गिल याने बारा चेंडूत दहा धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकारांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणे याला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. अजिंक्य रहाणे याने ३६ चेंडूमध्ये फक्त आठ धावांचे योगदान दिले.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *