Saturday , September 21 2024
Breaking News

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे कर्करोगाने निधन

Spread the love

 

हरारे : क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू हीथ स्ट्रीक यांचे बुधवारी वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. काही काळापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ते चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत होते.

तेव्हापासून हीथ स्ट्रीकची प्रकृती चिंताजनक होती. या वर्षी मे महिन्यात, झिम्बाब्वेच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते की, हीथ दक्षिण आफ्रिकेत उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर नाही.

हीथने नोव्हेंबर 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याचा पहिला सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना होता. यानंतर हीथने डिसेंबर 1993 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने शेवटची वनडे ऑगस्ट 2005 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि शेवटची कसोटी सप्टेंबर 2005 मध्ये भारताविरुद्ध खेळली. हीथने आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरला तीन वेळा आणि सौरव गांगुलीला चार वेळा बाद केले. आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात, हीथने भारताविरुद्धच्या हरारे कसोटीच्या पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात त्याने निम्मा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता. हीथने त्या सामन्याच्या पहिल्या डावात 32 षटकात 73 धावा देत सहा विकेट घेतल्या. मात्र, त्याच्या चमकदार कामगिरीनंतरही टीम इंडियाने तो सामना 10 गडी राखून जिंकला.

हीथ स्ट्रीकने 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर कसोटीत 1990 आणि एकदिवसीय सामन्यात 2943 धावा आहेत. टेस्टमध्ये हीथने एक शतक आणि 11 अर्धशतकं झळकावली, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 13 अर्धशतकं झळकावली.

याशिवाय हीथने कसोटीत 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत 73 धावांत सहा आणि एकदिवसीय सामन्यात 32 धावांत पाच विकेट अशी त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याशिवाय तो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा प्रशिक्षकही होता.

About Belgaum Varta

Check Also

भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर

Spread the love  नवी दिल्ली : टीम इंडियाचा ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *