बाकू (अझरबैजान) : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा घामटा काढला आहे. प्रज्ञानानंद याने सलग दुसऱ्या दिवशी दुसरा डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. अखेरची 35 मिनिटं अटीतटीची झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सामना बरोबरीत सोडण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे दुसरा डावही बरोबरीत सुटला आहे. आता उद्या प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही खेळाडूंच्या 20 चाली झाल्या तेव्हा प्रज्ञानानंद याचा वेळ एक तास सहा मिनिट झाला होता. तर कार्लसन याचा वेळ एक तास 18 मिनिट इतका नोंदवला गेला. भारताच्या 18 वर्षीय ग्रँडमास्टरने आपल्यापेक्षा अधिक अनुभवी आणि उच्च दर्जाच्या खेळाडूविरुद्ध प्रभावी कामगिरी केली.
बुधवारी आर. प्रज्ञानानंद याने कार्लसन याला झुंजवले होते. पहिला डाव बरोबरीत सोडला होता. बुधवारी पहिल्या क्लासिकल गेममध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याला प्रज्ञानानंद याने बरोबरीत रोखले. प्रज्ञानानंद याने 35 चालीनंतर बरोबरी साधण्यासाठी यशस्वी खेळी केली. प्रज्ञानानंद याने सेमीफायनलमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचा बुद्धीबळपटू फाबियानो याचा पराभव करत बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. प्रज्ञानानंद याने सेमीफायनलमध्ये 3.5-2.5 ने विजय मिळवत मोठा उलटफेर केला होता. आता फायनलमध्ये कोण बाजी मारणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta