Tuesday , March 3 2026
Breaking News

भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!

Spread the love

 

बुडापेस्ट : जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्याने ८८.१७ मीटरपर्यंत भालाफेक केली. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसर्‍या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले.
हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या (ऍथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप) २०२३ च्या शेवटच्या दिवशी आज भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. नीरजने ८८.१७ मीटर लांब भालाफेक करून ही सुवर्ण कामगिरी केली. २०२० साली ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राने आज येथे जागतिक स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा झेंडा आणखी उंच केला. यापूर्वी नीरज चोप्राने ऍथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.

नीरज चोप्राने दुसर्‍या फेरीत शानदार पुनरागमन केले
नीरज चोप्रा दुसर्‍या फेरीनंतर ८८.१७ मीटरसह अव्वल ठरला. त्याचवेळी जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसर्‍या फेरीत ८५.७९ मीटर फेक करून दुसरा आला. या फेरीनंतर झेक प्रजासत्ताकचा जेकोब वडलेच ८४.१८ मीटर गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिला.
भारतीय दिग्गज खेळाडूने तिसर्‍या फेरीत ८६.३२ मीटर अंतर पार केले. त्याचवेळी या फेरीनंतर पाकिस्तानचा अर्शद नदीम ८७.८२ गुणांसह दुसरा आला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याआधी नीरज चोप्राने ऑलिम्पिकशिवाय डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर आता नीरजने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून मोठा विक्रम केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *