
चेन्नई : भारताचा सध्याचा सर्वात यशस्वी फलंदाज शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचा संशय आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला गिलच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावं लागण्याची शक्यता आहे. तसं झालं तर भारतीय संघासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. कारण यंदाच्या मोसमात गिल जबरदस्त फॉर्मात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला सामना रविवारी चेन्नईत खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानं काल चिदंबरम स्टेडियमवर कसून सराव केला. पण भारतीय संघाच्या त्या सराव सत्रातून शुभमन गिलला माघार घ्यावी लागली. आता रविवारच्या सामन्यात तो खेळू शकतो की नाही याचा निर्णय आज होणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांनंतरच घेण्यात येईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिल खेळू शकला नाही, तर त्याच्या अनुपस्थितीत ईशान किशन किंवा लोकेश राहुलला सलामीला बढती देण्यात येईल.
Belgaum Varta Belgaum Varta