Wednesday , December 4 2024
Breaking News

दिल्ली कॅपिटल्सची पंजाब किंग्जवर १७ धावांनी मात

Spread the love

विजयानंतर घेतली थेट चौथ्या क्रमांकावर उडी
मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर १७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्ली संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानापासून थेट चौथ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. तर दुसरीकडे या सामन्यात पराभव झाल्यामुळे पंबाज किंग्ज हा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शक्यता धुसर झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने पंजाबसमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठवले होते. मात्र पंजाब संघ १४२ धावा करु शकला.

दिल्लीने दिलेल्या १६० धावांचे लक्ष्य गाठताना पंजाब संघ पूर्णपणे ढासळला. पंजाबचा जितेश शर्मा वळगता एकाही खेळाडूला चांगली फलंदाजी करता आली नाही. सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टो (२८) आणि शिखर धवन (१९) यांनी खास खेळी केली नाही. तसेच भानुका राजपक्षे (४), लियाम लिव्हिंगस्टोन (३), मयंक अग्रवाल (०) यांनी निराशा केली. हे महत्त्वाचे खेळाडू बाद झाल्यामुळे पंजाब किंग्जची दुर्दशा झाली.

त्यानंतर पाचव्या विकेटसाठी आलेल्या जितेश शर्माने संघाला सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. त्याने ३४ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. जितेश मैदानात असेपर्यंत पंजाबच्या विजयाच्या आशा होत्या. मात्र शार्दुल ठाकुरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि पंजाबच्या हातातून सामना गेला.

शेवटच्या फळीतील राहुल चहर (१८) वगळता एकही फलंदाज १० पेक्षा जास्त धावा करु शकला नाही. परिणामी दिल्ली कॅपिटल्सचा १७ धावांनी विजय झाला.

तर यापूर्वी सुरुवातीला फलंदाजीसाठी येत दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीला आलेला डेविड वॉर्नर झेलबाद झाल्यामुळे दिल्ली संघावरील दबाव वाढला. दिल्लीच्या मिचेल मार्शने (६३) अर्धशतकी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं. तर सरफराज खान (३२), ललित यादव (२४), अक्षर पटेल (१७) या तीन खेळाडूंनी समाधानकारक फलंदाजी केली. ज्यामुळे वीस षटके संपेपर्यंत दिल्लीला १५९ धावा करता आल्या.
गोलंदाजी विभागात दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी नेहमीप्रमाणे नेत्रदीपक कामगिरी केली. शार्दुल ठाकुरने शिखर धवन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, कसिगो रबाडा या चार दिग्गज फलंदाजांना बाद केलं. तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या जोडीने प्रत्येकी दोन गड्यांना बाद केलं. ज्यामुळे पंजाबचा संघ दिल्लीसमोर तग धरु शकला नाही. दिल्लीच्या गोलंदाजांसमोर फलंदाजांचा निभाव न लागल्यामुळे पंजाबचा पराभव झाला.

About Belgaum Varta

Check Also

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Spread the love  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *