
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. युवा सलामी फलंदाज शुभमन गिल याच्या प्रकृतीमध्ये सुधारणार आहे. शुभमन गिल आज अहमदाबादला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याआधी शुभमन गिल डेंग्यूने बेजार झाला होता. त्यामुळे त्याला दोन सामन्याला मुकावे लागले. भारतीय संघ चेन्नईतून दिल्लीत शुभमन शिवाय दाखल झाला. शुभमन गिल याने चेन्नईमध्ये उपचार घेतले.
मिळालेल्या वृत्तानुसार, शुभमन गिल याच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. तो चेन्नईतून आज अहमदाबादला रवाना झाला आहे. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर सामना होणार आहे. त्यासाठी गिल अहमदाबादला रवाना झाला आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम शुभमन गिल याच्यावर लक्ष ठेवून आहे, त्याच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणार आहे. पाकिस्तानविरोधात शुभमन गिल मैदानावत उतरणार का? याकडे सर्वच भारतीय चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. वर्षभरापासून शुभमन गिल भन्नाट फॉर्मात आहे. गिलची अनुपस्थिती भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरोधात प्रकर्षाने जाणवली, त्यामुळे गिलच्या कमबॅककडे सर्वच क्रीडा प्रेमी नजरा लावून बसले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta