नवी दिल्ली : रोहित शर्माचे वादळी शतक आणि विराट कोहलीचा फिनिशिंग टच, या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट आणि 15 षटके राखून पराभव केला. अफगाणिस्तानने दिलेले 273 धावांचे आव्हान भारताने दोन विकेट आणि 35 षटकांमध्ये सहज पार केले. भारताचा विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय होय. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आज अफगाण संघाविरोधात बाजी मारली. भारताचा पुढील सामना 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात अहमदाबाद येथे होणार आहे.
भारताच्या रोहित शर्मानं कर्णधारास साजेशी खेळी उभारून अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक साजरं केलं आहे. या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ईशान किशनच्या साथीनं भारताला शतकी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रोहितला भोपळाही फोडता आला नव्हता. त्या अपयशाची त्यानं आज अफगाणिस्तानविरुद्ध शतकानं भरपाई केली. रोहित शर्माचं वन डे कारकीर्दीतलं हे 31 वं आणि विश्वचषकातलं सातवं शतक ठरलं. त्याच्या 63 चेंडूंमधल्या शतकाला 12 चौकार आणि चार षटकारांचा साज आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमच्या सपाट खेळपट्टीवर भारताच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 272 धावांत रोखले. त्यानंतर रोहित शर्मा याने वादळी फलंदाजी करत हे आव्हान सहज पार करण्यास सिंहाचा वाटा उचलला. 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी वादळी सुरुवात केली. विशेषकरुन रोहित शर्मा याने धावांचा पाऊस पाडला. रोहितपुढे अफगाणिस्तानची गोलंदाजी अतिशय दुबळी आणि कमकुवत जाणवत होती. रोहितच्या वादळात अफगाणिस्तानचे सर्वाच गोलंदाज उडून गेले. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी अवघ्या 18.4 षटकात 156 धावांची सलामी दिली. दोघांनीही अफगाण गोलंदाजांचा समाचार घेतला.
रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी अवघ्या 112 धावांत 156 धावांची भागिदारी केली. ईशान किशन अर्धशतक करण्यात चुकला. ईशान किशन याने 47 चेंडूत 47 धावांची खेळी केली. रोहित शर्मा वादळी फलंदाजी करताना दुसऱ्या बाजूला ईशान किशन याने संयमी फलंदाजी करत चांगली साथ दिली. ईशान किशन याने आपल्या 47 धावांच्या खेळीमध्ये 2 षटकार आणि 5 चौकार लगावले. ईशान किशन बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डाव सावरला.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 49 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा याने अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकत अनेक विक्रमांना गवसणी घातली. विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक शतकांचा विक्रम केला. सर्वाधिक षटकार यासह अनेक विक्रम रोहित शर्माने केले. रोहित शर्माने सर्वच अफगाण गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित शर्माने 84 चेंडूमध्ये पाच षटकार आणि 16 चौकारांचा समावेश आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डावाची सुत्रे संभाळली.
विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या जोडीने भारताला वजय मिळवून दिला. विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्ये अभ्यद्य भागादारी झाली. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 56 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. विराट कोहलीने नाबाद 55 तर श्रेयस अय्यर याने नाबाद 25 धावांची खेली केली. विराट कोहलीने सहा चौकार लगावले तर अय्यरने एक षटकार आणि एक चौकार मारला.
अफगाणिस्तानच्या सर्वच गोलंदाजाची धुलाई झाली. राशिद खानचा अपवाद वघलता एकाही गोलंदाजाला विकेट घेतला आली नाही. राशिद खान याने दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी अफगाणिस्तान नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहिदी (88 चेंडूत 80), उमरजाई (69 चेंडूत 62) यांच्या दमदार फलंदाजीच्या जाेरावर अफगाणिस्तानने 50 षटकात 8 गडी गमावत 272 धावा केल्या आहेत.
अफगाणिस्तानने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. सहा षटकात विनाबाद 28 धावा केल्या. सातव्या षटकात सलामीवीर इब्राहिम झद्रानला वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराहने यष्टीरक्षक केएल राहुल करवी झेलबाद केले. त्याने 28 बॉलमध्ये 22 धावा केल्या. यामध्ये चार चाैकारांचा समावेश हाेता. सामन्याच्या 13 व्या षटकात अफगाणिस्तानला दुसरा धक्का बसला. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने गुरबाजला शार्दुल ठाकूर करवी झेलबाद केले. गुरबाजने आपल्या खेळीत 28 बॉलमध्ये 21 धावा केल्या.