
नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 8 विकेट आणि 15 षटके राखून धुव्वा उडवला. भारताचा हा विश्वचषकातील सलग दुसरा विजय होय. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या विजयाचे हिरो ठरले. भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयामुळे भारतीय संघाने गुणतालिकेत पाकिस्तानला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाने प्रत्येकी दोन दोन सामने जिंकले आहेत. पण न्यूझीलंडचा नेटरनरेट चांगला असल्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत.
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला. विराट विजयामुळे भारतीय संघाचा नेटरनेरटही सुधारला आहे. भारतीय संघाचा नेटरनरेट +1.5 इतका झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तानचा रनरेट 0.9 इतका आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा नेटरनेरट +2 पेक्षा जास्त आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा फक्त एक सामना झालाय. ते दोन गुणांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहेत.
इंग्लंडचा संघ दोन सामन्यात एक विजय एक पराभवासह पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर विराजमान आहे. बांगलादेश संघालाही एक विजय आणि एक पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेचं खातेच उघडले नाही
पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि एक वेळा चषक उंचावणारा श्रीलंका यांना विजयाचे खाते अद्याप उगडता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ सातव्या स्थानावर आहे. तर श्रीलंका संघाला आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंका संघ आठव्या स्तानावर आहे. अफगाणिस्तान नवव्या आणि नेदरलँड दहाव्या स्थानावर आहे. नेदरलँड संघालाही दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
Belgaum Varta Belgaum Varta