Friday , November 22 2024
Breaking News

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर! मोहम्मद शमीसह २६ जणांना अर्जुन पुरस्कार, सात्विक-चिरागला खेलरत्न

Spread the love

 

नवी दिल्ली : क्रीडा पुरस्कारांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील दोन युवा बॅडमिंटन स्टार्सची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. या दोघांनी जगभरात बॅडमिंटन दुहेरीत भारताचे नाव लौकिक मिळवले आहे. क्रीडा मंत्रालयाने या सर्व नावांना दुजोरा दिला आहे.

जानेवारीमध्ये सर्व खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असून त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान हे क्रीडा पुरस्कार दिले जातील. खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानित करण्यात येणार्‍या खेळाडूंची निवड त्यांच्या त्या वर्षातील कामगिरीच्या आधारे केली जाते. क्रीडा विभाग त्याच्या नावाची शिफारस करतो. अर्जुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांच्या यादीत लांब उडीपटू श्रीशंकर, स्टार पॅरा अॅथलीट शीतल देवी, स्टार महिला हॉकीपटू सुशीला चानू यांच्यासह २६ खेळाडूंचा समावेश आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या माहितीनुसार, विविध समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि सखोल तपासणीनंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. मंत्रालयाने सन्मानित करण्यात येणार्‍या खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही प्रसिद्ध केली आहे.

अर्जुन पुरस्कार
मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (दृष्टीहीन क्रिकेट), ओजस प्रवीण देवतळे, अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि मुरली श्रीशंकर (अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धिबळ), दिव्याकृती सिंग आणि अनुष अग्रवाल (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक आणि सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आणि ईशा सिंग (शूटिंग), अनंत पंघाल आणि सुनील कुमार (कुस्ती), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), पवन कुमार आणि रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खोखो), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॅश), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *