Friday , November 22 2024
Breaking News

बटलरच्या नाबाद शानदार शतकाच्या जोरावर राजस्थानकडून आरसीबीचा सहा गडी राखून पराभव

Spread the love

 

जयपूर : आयपीएल २०२४ मधील १९ वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने होते. ज्यामध्ये राजस्थानने आरसीबीचा विकेट्सनी पराभव करत यंदाच्या हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर ३ बाद १८३ धावां केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानने जोस बटलरच्या नाबाद शतकाच्या जोरावर १९. षटकांत ४ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला.

जोस बटलरचे आयपीएलमधील सहावे शतक
सलामीवीर जोस बटलरच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर राजस्थानने आरसीबीचा सहा गडी राखून पराभव केला आहे. बटलरने ५८ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर नाबाद १०० धावा केल्या. त्याचे आयपीएल कारकीर्दीतील हे सहावे शतक आहे. राजस्थानचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे, तर आरसीबीने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. विराट कोहलीच्या नाबाद ११३ धावांच्या जोरावर आरसीबीने ३० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावा केल्या होत्या, मात्र बटलरचे शतक आणि कर्णधार संजू सॅमसनच्या ६९ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने पाच चेंडू शिल्लक असताना चार गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा करत विजयाची नोंद केली.

जोस बटलरने ठोकला विजयी षटकार
आरसीबीवरील या विजयासह, राजस्थान संघ चार सामन्यांत चार विजय आणि आठ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे, तर कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघ सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकात संघाने यशस्वी जैस्वालची विकेट गमावली. यशस्वी खाते न उघडताच बाद झाला, मात्र यानंतर बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आणि दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. अर्धशतक झळकावल्यानंतर सॅमसनने आपली विकेट गमावली, पण बटलरने शेवटपर्यंत टिकून राहून षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले आणि संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला. ज्यामुळे विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थ ठरली.

आरसीबीने केल्या होत्या १८३ धावा
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ३गडी गमावून १८३ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने आरसीबीसाठी शानदार शतक झळकावले. विराटने ७२ चेंडूत नाबाद ११३ धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान कोहलीने १२चौकार आणि ४ षटकार मारले. याशिवाय कर्णधार फाफ डू प्लेसिसने ३३ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. फॅफने आपल्या खेळीत २ चौकार आणि २ शानदार षटकार मारले. राजस्थान रॉयल्सच्या वतीने फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी सादर केली. चहलने ४ षटकात ३४ धावा देत २ बळी घेतले. या सामन्यात चहलनेच राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. चहलेशिवाय बर्गरनेही चांगली गोलंदाजी केली. बर्गरने ४ षटकात ३३ धावा देऊन एक बळी घेतला होता.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *