Sunday , December 22 2024
Breaking News

मार्कस स्टॉयनिसच्या शतकाच्या जोरावर लखनऊने चेन्नईचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा, ऋतुराजची खेळी ठरली व्यर्थ

Spread the love

 

चेन्नई : आयपीएल २०२४ मधील ३९वा सामना एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे खेळला जात आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये लखनऊ सुपरजायंट्सने मार्कस स्टॉयनिसच्या शतकाच्या जोरावर सीएसकेवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर २१० धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, प्रत्युतरात लखनऊने १९.३ षटकांत २१३ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला.

लखनऊ सुपर जायंट्सने सलग दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. घरच्या एकाना मैदानावर ८ गडी राखून पराभूत केल्यानंतर आता लखनऊने चेपॉकमध्ये चेन्नईचा ६ गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ४ विकेट्स गमावत २१० धावा केल्या. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने नाबाद १०८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात लखनऊने १९.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. मार्कस स्टॉइनिसने ६३ चेंडूत १२४ धावांवर नाबाद राहिला. हे त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील पहिले शतक ठरले. या विजयासह लखनऊचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने चेन्नईची जागा घेतली, जी पाचव्या स्थानावर घसरली आहे.

दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना एलएसजीची सुरुवात खूपच खराब झाली. क्विंटन डी कॉक शून्य आणि कर्णधार केएल राहुलने १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लखनऊसाठी सर्वाधिक धावा मार्कस स्टॉइनिसने केल्या, ज्याने ५६ चेंडूत शतक पूर्ण केले आणि ६३ चेंडूंच्या खेळीत नाबाद १२४ धावा केल्या. या खेळीत स्टॉइनिसने १३ चौकार आणि ६ षटकारही मारले. शेवटच्या षटकांमध्ये दीपक हुडानेही ६ चेंडूत १७ धावांची तुफानी खेळी करत लखनऊच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची झाला धुलाई
विशेषत: मोईन अली आणि तुषार देशपांडे चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगलेच महागात पडले. सीएसकेकडून मथीशा पाथिरानाने २ बळी घेतले. त्याच्याशिवाय दीपक चहर आणि मुस्तफिजुर रहमाननेही प्रत्येकी १ बळी घेतला. अवघ्या ३ षटकांत ४२ धावा देत शार्दुल ठाकूरला काही विशेष करता आले नाही. चेन्नईच्या गोलंदाजांची इतकी धुलाई झाली की त्यांनी शेवटच्या २७ चेंडूत ७६ धावा दिल्या. चेन्नईचा पुढचा सामना २८ एप्रिलला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे, तर लखनऊचा संघ २७ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध एकाना येथे खेळणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

आर. अश्विन आणि जडेजाने लाज राखली, पहिल्या दिवशी भारताच्या 6 बाद 339 धावा

Spread the love  चेन्नई : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *