लखनऊ : कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊच्या घरच्या मैदानावर एलएसजी संघाचा ९८ धावांनी मोठा पराभव केला. केकेआरने दिलेल्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ १५० धावाही करू शकला नाही. लखनऊची फलंदाजी बाजू फेल ठरल्याने संघ १३७ धावांवरच ऑल आऊट झाला. संघाकडून सर्वाधिक ३६ धावांची खेळी मार्कस स्टॉयनिसने केली. त्याच्याव्यतिरिक्त इतर सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले. या विजयासह लखनऊ आयपीएल २०२४ च्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
२३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाची सुरुवात खराब झाली. ज्यात २० धावांवर त्यांनी पहिली विकेट अर्शिन कुलकर्णीच्या रूपाने गमवली, जो केवळ ९ धावा करून बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉइनिसने केएल राहुलसह झपाट्याने धावा करायला सुरू केली. दोघांनी मिळून पहिल्या ६ षटकात संघाची धावसंख्या ५५ धावांपर्यंत नेली. ७० धावांवर लखनऊला दुसरा धक्का कर्णधार राहुलच्या (२२)रूपाने बसला. यानंतर संघाने लागोपाठ विकेट गमावल्या.
लखनऊने ६ बाद १०९ धावा केल्या. लखनौचा डाव १३७ धावांवर आटोपून केकेआरने केवळ ९८ धावांनी सामना जिंकला नाही तर प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले. केकेआरकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी ३ विकेट घेतले, आंद्रे रसेलने २ विकेट तर मिचेल स्टार्क आणि सुनील नरेन यांनी १-१ विकेट घेण्यात यश मिळवले.
कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २३५ धावा केल्या. सलामीवीर सुनील नारायणच्या ८१ धावांच्या खेळीवर मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. अवघ्या ३९ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची शानदार खेळी खेळली. याशिवाय केकेआरसाठी अंगक्रिश रघुवंशीने ३२ धावा केल्या तर शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या रमणदीप सिंगने केवळ ६ चेंडूंचा सामना करत २५ धावांची नाबाद धारदार खेळी खेळून संघाची धावसंख्या २३५ पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लखनऊकडून गोलंदाजीत नवीन उल हकने ३ तर रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.