नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 संघामध्ये दिनेश कार्तिकचे पुनरागमन झाले आहे. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकने फिनिशरची कामगिरी चांगली बजावली होती, त्यामुळे भारतीय निवडकर्त्यांनी त्याला टी-20 मालिकेसाठी संघात सामील केले आहे. दिनेश कार्तिकची संघात निवड झाली पण शिखर धवनची संघात निवड झाली नाही. त्यामुळे सुरेश रैना भडकला आहे.
आयपीएलच्या या हंगामात धवन चांगला खेळ खेळला. धवनने 14 सामन्यात 460 धावा केल्या आहे. एवढेच नाही तर धवनने आयपीएल 2021 च्या हंगामात 587 धावा केल्या आणि 2020 च्या हंगामात 618 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये शिखर धवन सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र त्यानंतरही निवड समितीने त्याला संघामध्ये स्थान दिले नाही. यावर आता रैनाने प्रश्न उपस्थित केला आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या शो मध्ये बोलताना म्हणाला की, जर निवड समिती कार्तिकच्या आताच्या कामगिरी त्याला संघामध्ये स्थान दिले तर शिखर धवनला का नाही. गेल्या 3 ते 4 वर्षात त्याने सातत्याने धावा करत आहेत. संघात निवड न झाल्याचे कुठेतरी त्याला वाईट वाटले असेल. प्रत्येक कर्णधाराला त्यासारखा खेळाडू संघात हवा असतो. पण धवन कोणत्याही स्तरावर धावा करणारा खेळाडू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta