Sunday , December 7 2025
Breaking News

भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय

Spread the love

 

टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सुपर 8 मधील आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने 47 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने 20 षटाकांत 10 विकेट्स गमावत 134 धावा केल्या.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसमोर अफगाणिस्तानचे फलंदाज नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 7 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादवने 4 षटकांत 32 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट पटकावली. अर्शदीपने 4 षटकांत 36 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

अफगाणिस्तानची खराब सुरुवात
अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य होते. रहमानउल्ला गुरबाजने केवळ 11 धावा केल्यानंतर यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद केल्याने संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाची धावसंख्या 23 होती तेव्हा तेव्हा प्रथम इब्राहिम झद्रान आणि हजरतुल्ला झाझाई केवळ 3 चेंडूत केवळ 2 धावा करून बाद झाले. संघाने 23 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर अजमतुल्ला उमरझाई आणि गुलबदीन नायब यांनी संघाची कमान सांभाळली आणि 10 षटकांत संघाची धावसंख्या 66 धावांवर नेली. 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 17 धावा करून गुलबदिन बाद झाला. अफगाणिस्तान अजून या मोठ्या धक्क्यातून सावरला नव्हता, त्यानंतर अवघ्या 4 चेंडूत उमरझाई 26 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. नजीबुल्ला झद्रान आणि मोहम्मद नबी यांनी मिळून 31 धावा जोडल्या. अफगाणिस्तानने 15 षटकांत 5 गडी गमावून 101 धावा केल्या आणि शेवटच्या 30 चेंडूत 81 धावा करायच्या होत्या. 17 व्या षटकात नबीने वेगवान खेळण्याचा प्रयत्न केला आणि षटकार मारला पण दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद झाला. अफगाणिस्तानला शेवटच्या 2 षटकात 67 धावा करायच्या होत्या, जे जवळजवळ अशक्य होते. शेवटच्या 2 षटकात फक्त 9 धावा आल्या, त्यामुळे भारताने हा सामना 47 धावांनी जिंकला.

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 विकेट्स गमावत 181 धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 53 धावा केल्या. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा 8, विराट कोहली 24 आणि ऋषभ पंत 20 धावा करत बाद झाला. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानसमोर भारताचे सलामीवीर गडगडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने चांगली भागिदारी करत भारताचा डाव सावरला. सूर्यकुमारने 28 चेंडूत 53 धावा केल्या. तर हार्दिक पांड्या 24 चेंडूत 32 धावा करत बाद झाला. तर अफगाणिस्तानकडून राशिद खानने 3, फजलहक फारुकी 3 आणि नवीन उल हकने 1 विकेट घेतली.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *