Sunday , July 26 2026
Breaking News

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज सकाळी 10 वाजता भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने हिंडलगा सुळगा, फॉरेस्ट नाक्यावर सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यापासून एका पाठोपाठ एक जनविरोधी निर्णय सरकार घेत आहे. भाजप सरकार 4000 रुपये किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जात होते ते काँग्रेस सरकारने बंद केले आहे, विद्युत दर वाढविले आहेत, दुधाचे दर वाढविले आहेत, मराठा समाजाच्या विकासासाठी 100 कोटी भाजप सरकारने दिले होते त्यातले 50 कोटी काँग्रेस सरकारने काढून घेतले आहेत. उदुगिरी येथे शाहू महाराजांच्या समाधीच्या विकासासाठी 5 कोटी भाजप सरकारने दिले होते ते सुद्धा या काँग्रेस सरकारने काढून घेतले आहे. एस सी, एस टी समाजाच्या विकासासाठी 11000 कोटी भाजप सरकारने दिले होते ते काढून घेऊन या काँग्रेस सरकारने त्यातील 10000 कोटी मुस्लिम समाजाला दिले आहे, त्यातच आता पेट्रोल व डिझेलमध्ये दरवाढ करून जनतेला प्रचंड महागाईचा चटका बसत आहे त्यामुळे हे सरकार सत्तेवर राहण्याच्या योग्य नसून या सरकारच्या काळामध्ये कर्नाटक राज्य दिवाळखोरी होण्याच्या वाटेवर आहे.

यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर, बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, हिंडलगा ग्राम पंचायत माजी अध्यक्ष, सदस्य रामचंद्र मन्नोळकर यांनी काँग्रेस सरकारच्या विरोधात आपले विचार मांडले.

या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची कोंडी झाली होती. या कार्यक्रमामध्ये प्रदीप पाटील, कल्लापा सुतार, पंकज घाडी, यल्लेश कोलकार, भाग्यश्री कोकितकर, नारायण पाटील, अजित हलकर्णी, विलास ताशिलदार, पवन देसाई, गुरुराज हलगत्ती, यतेश हेब्बाळकर, लक्ष्मी परमेकर, उमा सोनवडेकर सुमन राजगोळकर, गणपतराव देसाई तसेच शेकडो भाजपा महिला, कार्यकर्ते आणि आजूबाजूचे गावातील रहिवासी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *