मुंबई : भारताने शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे. टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. देशातील क्रिकेटप्रेमी टी२० विश्वचषक जिंकण्याचा उत्साह साजरा करत असतानाच दोन दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सुरुवातील विराट कोहलीने टी-२० क्रिकेट सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयसीसीच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. आयसीसीने म्हटलं आहे की, ‘विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
३७ वर्षीय रोहित शर्माने संघाची कमान सांभाळत शनिवारी इतिहास रचला. टी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेत टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान भारताने पटकावला. भारताने चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा मान पटकावला आहे.
टीम इंडियाने आज शनिवारी झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ७ धावांनी दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. या विजयासोबत टीम इंडियाने देशातील १४० कोटी लोकांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी दिली. क्रिकेट चाहते आनंदोत्सव साजरा करत असतानाच विराट कोहली आणि रोहित शर्माने टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
सामन्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत म्हटलं की, ‘आजचा सामना माझा शेवटचा सामना होता. टी-२० क्रिकेटला अलविदा म्हणायला आजच्या सारखा दुसरा चांगला दिवस नाही. टी-२० विश्वचषक जिंकण्याचं माझं लक्ष्य होतं. मी आता शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. मला जसं वाटत होतं, तसंच झालं आहे. मी या क्षणासाठी आतुरतेने वाटत पाहत होतो. माझ्या आनंदाला आता सीमाच उरलेली नाही’.