Tuesday , March 3 2026
Breaking News

गौतम गंभीरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

Spread the love

 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर याची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड टी20 विश्वचषकानंतर संपल्यानंतर निवृत्त झाले. राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे. जय शाह यांनी गौतम गंभीर यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्याची घोषणा करताना आनंद होत असल्याचे म्हटले.
गौतम गंभीर यांचे भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वागत करत आहे. आधुनिक क्रिकेट वेगाने विकसित होत आहे. गौतम गंभीर या बदलांचा साक्षीदार आहे. गौतम गंभीरने त्याच्या कारकिर्दीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विविध पदांवर काम केले आहे. गौतम गंभीर भारताच्या प्रशिक्षक पदासाठी योग्य व्यक्ती आहे. तो भारताचे क्रिकेट पुढे नेईल, असे जय शाह म्हणाले.
गौतम गंभीर यांच्याकडे भारतीय क्रिकेट संघासाठी स्पष्टपणे व्हिजन आहे. याला गौतम गंभीरच्या प्रदीर्घ अनुभवाची आणि विविध पदांवर काम केल्याची जोड देखील आहे. यामुळं भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदावर काम करण्यासाठी गौतम गंभीर योग्य ठरतो. बीसीसीआयचा गौतम गंभीरला पुढील प्रवासासाठी पूर्ण पाठिंबा असल्याचं जय शाह म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *